+91 7755983051/9028269571 reservation@jharanajunglelodge.com COVID 19 Guidelines
jharanajunglelodge
jharanajunglelodge jharanajunglelodge jharanajunglelodge
img

वाघांचे आकर्षण आणि बरेच काही..

ताडोबा बद्दल कोणी बोलले तर लगेच पट्टेदार जंगली मांजर म्हणजेच वाघांचा विचार येतो. सिंह जरी जंगलाचा राजा असेल तरी वाघही जंगलात अगदी राजेशाही थाटात फिरतात. भारतात वाघांसाठी काही वन्यजीव अभयारण्ये आहेत, त्यापैकीच एक म्हणजे 'ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह'. आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अशा रिझर्व्हसची चांगल्या प्रकारे निगा राखणे आणि जतन करणे महत्वाचे आहे. आदिवासींचे पुज्यनीय दैवत 'ताडोबा' किंवा 'तरु' यांच्या नावावर ताडोबा अभयारण्याचे नाव ठेवले गेले आहे. प्राणीप्रेमींसाठी ताडोबा हे एक उत्तम 'हॉटस्पॉट' बनले आहे. 

भारतात काही वन्यजीव अभयारण्ये आहेत जे 'सेव्ह टायगर' मिशन गंभीरपणे घेत आहेत. ताडोबा म्हणजे पर्यटकांना आकर्षित करणारे पर्यटन स्थळ म्हणून नेहमीच चित्रित केले गेले आहे. ताडोबामध्ये चित्ता, स्लॉथ अस्वल, जंगली मांजरी आणि लहान भारतीय सिव्हेट यांसारखे इतर सस्तन प्राणी सुद्धा आहेत. याशिवाय तिथे अनेक सरपटणारे प्राणी, पक्षांच्या विविध प्रजाती आणि विविध कीटक हे पर्यावरणाचे संतुलन राखत आहेत. या ठिकाणाचे मुख्य आकर्षण म्हणजे ताडोबातील वाघ दाखवणारी सफारी आहे. ओपन जीप आणि बस हे पर्याय सुद्धा पर्यटकांकरिता येथे उपलब्ध आहेत. तुम्ही ताडोबाला थेट सुद्धा जाऊ शकता किंवा रिसॉर्टसोबतचे पॅकेज टूर सुद्धा बुक करू शकता जे तुम्हाला जंगलातील कोर आणि बफर झोनची प्लॅन केलेली टूर देईल. नवेगाव गेट जवळील 'झरना लॉज' हे ताडोबा मधील एक प्रसिद्ध रिसॉर्ट आहे. 

सफारी शिवाय तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात फिरू शकता, सोबतच रोप वॉल्क आणि बर्ड वॉचिंग सुद्धा करू शकता. जर तुम्ही ताडोबाची ट्रिप प्लॅन करत असाल, तर फक्त वाघांना बघण्यासाठीच तिथे येऊ नका, तर तिकडचे नैसर्गिक सौंदर्य व विविध जीवांना बघण्यासाठी या.. ताडोबाची ज्याप्रमाणे निगा राखली जात आहे त्यावरून त्याची लोकप्रियता दिसून येते. 

जबाबदार पर्यटक म्हणून आपल्यालाही अभयारण्यांचे जतन करण्यासाठी मदत करायला हवी. आपण अभयारण्ये घाण करण्याऐवजी त्यांची निगा कशी राखावी याबद्दल निरीक्षण करून ते शिकले पाहिजे. झरना रिसॉर्ट त्यांच्या पर्यटकांसाठी स्पेशल टूर पॅकेजेसची व्यवस्था करतात ज्यामध्ये टेम्पल विझिट, व्हिलेज विझिट आणि साईटसिईंगचा सुद्धा समावेश आहे.Comments    Comments: 0

Recent Posts

img Rare Black Panther sighting at Tadoba...   February 12, 2021
img Monitoring Tiger Moves...   February 05, 2021
img Water safari for you!...   January 29, 2021
img Protect your National Animal...   January 22, 2021
img New guests at Tadoba!...   January 08, 2021
Back To Top