+91 7755983051/9028269571 reservation@jharanajunglelodge.com COVID 19 Guidelines
jharanajunglelodge
jharanajunglelodge jharanajunglelodge jharanajunglelodge
img

झरना जंगल लॉजसोबत घ्या ताडोबाचा लाईव्ह अनुभव!!

ताडोबा हे निसर्गातील एक नंदनवन आहे हे तुम्ही ऐकलेच असेल आणि प्रत्येक निसर्गप्रेमीला अशा विविध झाडझुडपांनी व प्राण्यांनी वेढलेल्या श्रीमंत नैसर्गिक जागेचा अनुभव ताडोबा अंधारी नॅशनल पार्क मध्ये येतोच. जंगलाला भेट देणे ही पर्यटकांसाठी रोमांचक गोष्ट असते पण त्यापेक्षाही पर्यटकांना राहण्याची, खाण्याची आणि स्वच्छतेची चिंता सतावत असते. तर अशावेळी तुम्ही रिलॅक्स रहा, कारण तुमच्या घरापासून दूर पण घरासारखेच असणारे झरना जंगल लॉज तुम्हाला सर्व सुविधा पुरवत आहे. नॅशनल पार्कजवळील नवेगाव येथे स्थित असलेले हे पूर्णपणे इको फ्रेंडली लॉज असून हे तुम्हाला फक्त स्टे च ऑफर नाही करत तर एक आनंददायी अनुभव आणि संपूर्ण आयुष्यासाठी बर्याच आठवणी प्रदान करते.

चला तर बघूया ताडोबा अंधारी नॅशनल पार्क आणि झरना जंगल लॉजसोबत वाईल्डलाईफ सेंच्युरीचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तुमची ट्रिप कशी प्लॅन करू शकता!!


सफारी अँड नेचर (१रात्र/ २दिवस)

या १रात्र आणि २दिवसाच्या टूर पॅकेजमध्ये रिसॉर्टला चेकइन केल्यावर तुम्ही तेथील रेस्टोरेंट मध्ये लंच करू शकता. यासोबतच स्विमिंग पूल, रिसॉर्ट विझीट, गार्डन एरिया आणि विविध गेम्सचा आनंद तुम्ही घेऊ शकता. संध्याकाळच्या चहानंतर तुम्ही ताडोबाच्या इतिहासाबद्दल तिकडच्या तज्ज्ञांकडून माहिती घेऊ शकता. तिकडे तुम्ही प्राणी आणि झाडाझुडपांचे फोटोज आणि व्हिडीओज सुद्धा बघू शकता. थंडीच्या दिवसात तुम्ही तेथे कॅम्पफायरची मजा अनुभवू शकता. यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी तुम्ही जंगल वाईल्डलाईफ सफारीसाठी तयार व्हावे लागेल. आमचे निसर्गतज्ज्ञ तुम्हाला सफारीला घेऊन जातील तसेच तुम्हाला जंगलातील पक्षी, प्राणी आणि झाडाझुडपांबद्दल माहिती देतील. तुम्ही जंगलातील अशा निसर्गरम्य वातावरणात उत्तम नाश्ता करू शकता. सफारीनंतर तुम्हाला फ्रेश होण्यासाठी आणि पूल मध्ये रिलॅक्स होण्यासाठी वेळ मिळेल. सफारीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी दुपारी १२ वाजता चेकआऊटची वेळ असेल.


वाईल्डलाईफ अँड २ सफारी (२ रात्र/ ३ दिवस)

या २ रात्र/ ३ दिवसाच्या टूर पॅकेजमध्ये सर्वप्रथम झरना जंगल लॉज मध्ये चेकइन करून तुम्ही थेट लंचसाठी जाऊ शकता. त्यानंतर स्विमिंग पूल, रिसॉर्ट विझिट, गार्डन एरिया इकडे रिलॅक्स होऊ शकता. सोबतच तेथे उपलब्ध असणारे गेम्स सुद्धा खेळू शकता. संध्याकाळच्या चहानंतर तुम्ही ताडोबाच्या इतिहासाबद्दल तिकडच्या तज्ज्ञांकडून माहिती घेऊ शकता. तिकडे तुम्ही प्राणी आणि झाडाझुडपांचे फोटोज आणि व्हिडीओज सुद्धा बघू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्ही आमच्या निसर्ग तज्ज्ञांसोबत रिसॉर्टपासून १५ किलोमीटर दूर असलेल्या पळस गावाला भेट देऊ शकता. तेथे तुम्ही बांबूपासून हाताने बनवणाऱ्या हस्तकलेच्या कार्यशाळेला भेट देता येईल. त्यानंतर तुम्ही स्विमिंग पूल मध्ये आराम करू शकता किंवा रिसॉर्टमधील इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभागी होऊ शकता. त्यानंतर शेवटच्या दिवशी तुम्हाला जंगल सफारीसाठी नेले जाईल. आमचे निसर्गतज्ज्ञ सफारी दरम्यान तुम्हाला जंगलातील पक्षी, प्राणी आणि झाडाझुडपांबद्दल माहिती देतील. जंगलातील अशा निसर्गरम्य वातावरणात उत्तम नाश्ता करू शकता. सफारीनंतर तुम्हाला फ्रेश होण्यासाठी आणि पूल मध्ये रिलॅक्स होण्यासाठी वेळ मिळेल. सफारीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी दुपारी १२ वाजता चेकआऊटची वेळ असेल.


वाईल्डलाईफ, नेचर अँड टेम्पल (२ रात्र/ ३ दिवस)

ऐतिहासिक मंदिर भेटीने या २ रात्र व ३ दिवसाच्या ट्रिपला एक वेगळेच आकर्षक वळण मिळते. झरना जंगल लॉज मध्ये चेकइन करून तुम्ही थेट लंचसाठी जाऊ शकता. त्यानंतर स्विमिंग पूल, रिसॉर्ट विझिट, गार्डन एरिया इकडे रिलॅक्स होऊ शकता. सोबतच तेथे उपलब्ध असणारे गेम्स सुद्धा खेळू शकता. संध्याकाळच्या चहानंतर तुम्ही ताडोबाच्या इतिहासाबद्दल तिकडच्या तज्ज्ञांकडून माहिती घेऊ शकता. तिकडे तुम्ही प्राणी आणि झाडाझुडपांचे फोटोज आणि व्हिडीओज सुद्धा बघू शकता. दुसऱ्या दिवशी तुम्ही आमच्या निसर्ग तज्ज्ञांसोबत रिसॉर्टपासून १५ किलोमीटर दूर असलेल्या पळस गावाला भेट देऊ शकता. तेथे तुम्ही बांबूपासून हाताने बनवणाऱ्या हस्तकलेच्या कार्यशाळेला भेट देता येईल. त्यानंतर शेवटच्या दिवशी तुम्ही आमच्या निसर्गतज्ज्ञांसोबत तिकडचे अतिशय लोकप्रिय असे बालाजी मंदिर फिरू शकता.

तर ताडोबामधील जंगल सफारी आणि झरना जंगल लॉजमधील स्टे तुमच्या ट्रीपची मजा नक्कीच वाढवेल. तुमच्या उत्तम ट्रिप साठी झरना जंगल लॉज तुम्हाला वेगवेगळे सफारी पॅकेजेस सुद्धा ऑफर करत आहे. हे पॅकेजेस म्हणजे जंगल सफारीच्या ऍडव्हेंचरची एक झलक आहे.

जंगल सफारी आणि इतर टूर पॅकेजेस बद्दल अधिक महिती मिळविण्यासाठी आम्हाला संपर्क करा. आम्ही इकडे झरना जंगल लॉज मध्ये तुम्हाला उत्तम सेवा आणि एक ऍडव्हेंचरस वाइल्डलाईफ सफारीची मजा नक्कीच पुरवू!Comments    Comments: 0

Recent Posts

img After the break of three months...   November 25, 2021
img Forest Mushroom...   November 16, 2021
img Tiger’s Territory...   October 29, 2021
img Are we really looking forward to...   March 05, 2021
img First Hand Safari experience...   February 26, 2021
Back To Top