+91 7755983051/9028269571 reservation@jharanajunglelodge.com COVID 19 Guidelines
jharanajunglelodge
jharanajunglelodge jharanajunglelodge jharanajunglelodge
img

ताडोबामधील वैशिष्ट्यपूर्ण वाघ!

नोव्हेंबर महिना चालू झाला आणि गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. ताडोबा अंधारी नॅशनल पार्क मधील जंगल सफारी अनुभवण्यासाठीचा उत्तम ऋतू आता सुरु आहे. हिवाळा ऋतू म्हणजे पर्यटक व वन्यजीव प्रेमींसाठी उत्तमोत्तम नैसर्गिक सौंदर्य दृश्ये आणि वेगवेगळ्या सुरेख वनस्पती बघण्यासाठीचा काळ असतो. हिवाळ्याच्या सुरुवातीला ताडोबा नॅशनल पार्क हे अगदी थोडे थंड असते. म्हणजे अगदी हळूहळू तेथे थंडी पसरत असते. तलावाजवळ सुद्धा अगदी सौम्य धुके आपल्याला दिसू शकते.
ही तीच वेळ असते जेव्हा पर्यटकांना जंगलात वाघ मनसोक्तपणे फिरताना दिसतात. वाईल्डलाईफ एक्सपर्ट्सच्या मते, थंडीच्या काळात सकाळच्या वेळी वाघांना भटकायला फार आवडते. हा खरंच त्यांचा आवडता वेळ असतो जेव्हा ते दाट वनक्षेत्रात गस्त घालतात, तर चंद्रपूरला भेट देण्याची आणि जंगल सफारीसाठी ही अतिशय योग्य वेळ आहे.
सफारी जीप मध्ये बसण्याअगोदर ताडोबा मधील जंगल सफारीचे स्टार - तिकडच्या लोकप्रिय वाघांबद्दल जाणून घेऊया!!

माया (वाघीण) - 

माया ही ताडोबा जंगल सफारीची खरी स्टार आहे. ही एक अशी वाघीण आहे जीच्या अस्तित्वाने व मोहिनीने संपूर्ण जंगलावर तिचे राज्य आहे. तिला स्वतःच्या डोळ्यांनी बघावे हे प्रत्येक वन्यप्रेमीचे स्वप्नच असते. नर वाघ आणि इतर प्राण्यांकडून तिच्यावर हल्ला होण्याचा नेहमीच धोका असला तरीही, माया तिच्या सोबत राहणाऱ्या वाघिणींना व बछड्यांना नेहमीच सामर्थ्य देत असते. सर्व बछडे जंगलात सुरक्षित असल्याचे ती निश्चित करते. ताडोबामध्ये असताना तुम्ही तिला पाहणे चुकवू शकत नाही!

वाघडोह (वाघ) - 
वाघडोह हा भारतातील सर्वात मोठा वाघ आहे आणि ताडोबाची जंगल सफारी आपल्याला त्याच्या या भव्यतेची साक्ष देते. हा वाघ ताडोबाचा राजा म्हणून ओळखला जातो आणि निसर्गशास्त्रज्ञांच्या मते, तो आठवड्यातून एकदा जंगलातील प्राण्यांसाठी दरबार प्रकारची सभा भरवतो. जर तुम्ही भाग्यवान असाल तर तुम्हाला ही सभा सुद्धा बघावयास मिळेल!! काय मग, 'लायन किंग'ची आठवण आली की नाही?

मटकासुर (वाघ) - 
८ वर्षांचा मटकासुर ताडोबा जंगलाचा सर्वात सक्रिय आणि प्रबळ वाघ आहे. मारामारी आणि शिकारच्या नोंदींसह, मटकासुर खरोखरच एक उग्र, शक्तिशाली वाघ आहे जो खरंच पाहण्यालायक आहे. तो अनेकदा ताडोबातील जामुन पाण्याजवळ आणि खुटवंडा भागाजवळ फिरताना दिसून येतो.  

सोनम (वाघीण) - 
सोनम ही सुद्धा ताडोबाची स्टार आहे, कारण माया वाघीण ही नेहमीच सोनमची पाठराखण करते. तेलिया धरणावर राज्य करणारी ही वाघीण वाघांच्या बछड्यांची एक सक्रिय संरक्षक आहे. विशेष म्हणजे सोनमच्या उजव्या गालावर “एस” असे चिन्ह आहे आणि ती वाघीण सर्वांची आवडती आहे. तिने ३ बछड्यांना जन्म दिला आहे. तिच्या क्षेत्रात भरपूर अन्न व पाणी उपलब्ध आहे. तुम्हाला ती व तिचे बछडे दिसावे अशी आम्ही आशा करतो.

तर, या मोठ्या व्याघ्र प्रकल्पातील हे काही वाघ आहेत ज्यांच्याविषयी आम्ही तुम्हाला माहिती दिली. यांशिवाय बजरंगी (वाघ), छोटी तारा (वाघीण), सितारा (वाघीण), शिवाजी (वाघ), बोटेझरी (वाघीण), रांतलोधी (वाघ) आणि इतर बरेच वाघ बघण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. या हिवाळ्यात ताडोबा अंधारी नॅशनल पार्कला भेट द्या आणि रॉयल जंगल सफारीचा आनंद लुटा. झराना जंगल लॉज मध्ये आम्ही तुमच्या निवासाची, सोईची आणि एंटरटेनमेंटची पुरेपूर काळजी घेऊ. अत्यंत नाविन्यपूर्ण सुविधांनी सुसज्ज, हे स्थान जंगलातील लक्झरीचे उत्तम उदाहरण आहे. आमच्याकडे जंगल सफारी आणि स्टे बुक करा आणि उत्तमोत्तम वन्यजीवनाचा आनंद घ्या. Comments    Comments: 0

Recent Posts

img Are we really looking forward to...   March 05, 2021
img First Hand Safari experience...   February 26, 2021
img Rare Black Panther sighting at Tadoba...   February 12, 2021
img Monitoring Tiger Moves...   February 05, 2021
img Water safari for you!...   January 29, 2021
Back To Top