+91 7755983051/9028269571 reservation@jharanajunglelodge.com COVID 19 Guidelines
jharanajunglelodge
jharanajunglelodge jharanajunglelodge jharanajunglelodge
img

जागतिक वाघ्य्र दिवसाच्या निमित्ताने...

२९ जुलै रोजी नुकताच 'जागतिक वाघ्य्र दिवस' साजरा करण्यात आला. मांजरवर्गीयांमधील सगळ्यात मोठा प्राणी म्हणजे वाघ. सिंहाला आपण जंगलाचा राजा म्हणून ओळखतो पण त्याच्याच तोडीस तोड असणारा प्राणी म्हणजे वाघ... सिंह आपल्याला एकटाच दिसतो तर वाघ आपल्या कुटुंबासमवेत जंगलात फिरताना दिसतो. जंगलात त्याची ऐटच भारी!! वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी तर आहेच शिवाय जंगलाच्या राजापेक्षा त्याचा तोरा कमी नसतो. त्यामुळे त्याच्या गौरवार्थ व वाघांबद्दलच्या जनजागृतीसाठी २९ जुलै २०१० पासून सर्व देशांमध्ये 'जागतिक वाघ्य्र दिवस' साजरा करण्यात येतो. 

वाघ हे त्यांच्या क्षेत्राबाबत फार संवेदनशील असतात. त्यांना आपल्या क्षेत्रात कोणीही आलेले आवडत नाही. दुसरा प्राणी आलाच तर त्याच्यावर ते तुटून पडायलाही मागे पुढे पाहत नाहीत. अशा या वाघाच्या नैसर्गिक संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, त्यांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे आणि त्याबद्दल जनजागृती करणे हे या वाघ्य्र दिनाचे उद्द्येश्य आहेत. जंगलातील सगळ्यात शक्तिशाली, बुद्धिवान आणि हुशार प्राण्यांमध्ये वाघाचे नाव पहिलेच घ्यावे लागेल. असा हा शक्तिशाली प्राणी आज दुर्मिळ होण्याच्या वाटेवर आहे. त्यामुळे आज आपल्याला दुर्मिळ होत जाणाऱ्या या शक्तिशाली प्राण्याचे जतन करावेच लागेल. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला जगभरात सुमारे लाखोंच्या संख्येने असणाऱ्या वाघांची संख्या सध्या फक्त काही हजारांवर गेली असल्याचा अंदाज आहे. यापैकी सुमारे २००० वाघ भारतीय उपखंडात आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व भारतासाठी विशेष आहे. जंगलतोड करून त्यांचे घर हिरावून घेणे आणि त्याचप्रमाणे त्यांची बेकायदेशीर शिकार करणे हे भारतामध्ये वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याचे मुख्य कारण समजले जात आहे. 

वाघांचे जतन करण्यासाठी आज जगभरात सगळीकडे वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. मोठमोठे लोक वाघांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रमातून निधी उभा करत आहेत. जागतिक वाघ्य्र दिनाच्या निमित्ताने जगभरात लोकांना वाघांचे आपल्या जीवनतील महत्त्व कळत आहे. त्यामुळे आज अनेक लोक वाघांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेत आहेत. 

त्यात भारत सुद्धा मागे नाही. आज भारतात वाघांसाठी अनेक प्रकल्प सुरु केले गेले आहेत. यासाठी अनेक टायगर रिझर्व्ह सुरु करण्यात आले आहेत. त्यापैकी नागपूर येथील ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह हा सुद्धा महाराष्ट्रातील एक उत्तम वाघ्य्र प्रकल्प आहे. या टायगर रिझर्व्हला जाण्यासाठी आणि जंगलातील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी झरना जंगल लॉज ला नक्की भेट द्या.Comments    Comments: 0

Recent Posts

img Sal Tree...   January 10, 2022
img Oriental Garden Lizard...   January 06, 2022
img Wolf Spider...   December 25, 2021
img Green or Bamboo Pit Viper...   December 18, 2021
img Guide Traning At jharana Jungle Loadge...   December 11, 2021
Back To Top