
प्रोजेक्ट टायगर आणि 'ताडोबा'!
अलीकडच्या काळात वन्य प्राण्यांचे शहरी भागात प्रवेश करून लोकांमध्ये भीती पसरविण्याचे अनेक प्रकार झाले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी आपल्या जागेत का प्रवेश करत आहेत यावर विचार करणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरीकरण वाढत असल्याने भारतातील जंगले व हिरवळ धोक्यात आली आहेत. मानव गरज नसताना वन्य प्राण्यांच्या ठिकाणांवर अतिक्रमण करून त्यांची निवासस्थाने नष्ट करत आहे. नैसर्गिक वातावरणात प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी अनेक वन्य अधिकारी प्रयत्न करत आहेत. विविध उपायांच्या माध्यमातून हे अधिकारी शहरीकरण आणि जंगले यामध्ये योग्य संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
१९७३ मध्ये भारत सरकारने 'प्रोजेक्ट टायगर' हा वाघ संरक्षण कार्यक्रम सुरु केला. वाघांची एक व्यवहार्य लोकसंख्या त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानात सुनिश्चित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. महाराष्ट्र राज्याने विविध प्रकल्पांद्वारे हिरव्या जंगलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. 'टायगर कंझर्वेशन अथॉरिटी ऑफ इंडिया'ने 'प्रोजेक्ट टायगर' द्वारा आतापर्यंत महाराष्ट्रात ६ टायगर रिझर्व्हस सांभाळले आहेत. त्यामध्ये मेळघाट, ताडोबा, पेंच, सह्यांद्री, नवेगाव-नागझिरा आणि बोर यांचा समावेश आहे. २०१५ पर्यंत महाराष्ट्र हे सर्वात जास्त वाघांची लोकसंख्या असणारे पाचवे राज्य होते. ही अभयारण्ये केवळ वन्यजीवांचे संरक्षणच करत नाहीत तर मनुष्याच्या जीवनात त्यांना एक वेगळे स्थान देतात. वाईल्डलाईफ फोटोग्राफर आणि उत्साही साहसवर्गासाठी ही अभयारण्ये म्हणजे एक देणगीच आहे.
१९५५ साली निर्माण करण्यात आलेले 'ताडोबा राष्ट्रीय उद्यान' हे एक जुने अभयारण्य आहे जे १९९३ साली 'अंधारी वाईल्डलाईफ सेंचुरी' मध्ये सामील केले गेले आहे. नंतर त्याचे नाव 'ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह' ठेवण्यात आले. ताडोबा रिझर्व्ह हे मुख्यत्वेकरून दक्षिणी उष्णकटिबंधीय सूक्ष्म पिकांच्या वनासोबतच ८७ टक्के घनदाट जंगलातील संरक्षित परिसरात आहे. सध्या ताडोबा रिझर्व्ह मध्ये १४० वाघांसह भारतीय बिबळे, स्लॉथ बीयर, गौर, नीलगाय, कोळसून, पट्टेरी तरस, लहान भारतीय सिव्हेट, जंगली मांजरी, सांबर, ठिपकेदार हरीण, काकड, चितळ आणि चौशिंगा अशा अनेक वन्य प्राण्यांचा समावेश आहे. 'द रिअल लँड ऑफ टायगर' हे 'ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह'चे मुख्य शब्द आहेत आणि आणि या शब्दांप्रती जागरूक राहण्याकरिता हे रिझर्व्ह उत्तमरीत्या सांभाळण्यासाठी TATR पुढाकार घेत आहे. वन्यजीवांसोबत घडणाऱ्या या काही घटनांमुळे TATR हा नक्कीच उत्तम प्रयत्न आहे.
Comments: 0