
ताडोबा जंगल सफारीचा एक रोमांचक अनुभव!
" वाघांच्या शोधात जंगलातून चालणे आणि हे माहिती असणे की ते आधीच तुम्हाला बघत आहेत यापेक्षा रोमांचकारी दुसरे काहीच नाही.."
अनेक लोक स्वतःचे मोहक जंगल सफारीचे अनुभव सांगताना आपण ऐकत असतो, त्यांनी कशाप्रकारे निसर्गाच्या कुशीत एक उत्तम वेळ घालवला. तुम्ही सहमत असाल किंवा नाही पण तुम्हाला सुद्धा जीवनात एकदातरी असा रोमांचक अनुभव घ्यावासा वाटत असेल.. हो ना? पण तुमच्या सर्व ट्रिप्स शहरी ठिकाणीच होतात. हे सर्व त्यामुळेच कारण तुम्ही नेहमी शांत ठिकाणांऐवजी लक्झरीयस जागांची निवड करता.. जर तुम्ही एक उत्साही निसर्गप्रेमी असाल तर आपल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून निसर्गातील न शोधलेल्या पायवाटांचा शोध घेणे व आपल्या इकोसिस्टिमला समजून घेणे तुम्हाला पुष्कळ आनंद देऊ शकेल.
जंगल सफारी तुम्हाला प्राण्यांच्या एका अशा जगात घेऊन जाईल जिकडे एक वेगळेच वातावरण असते. प्राणी संग्रहालयात आपण अनेक प्राण्यांना सहज पाहू शकतो. परंतु प्राण्यांच्या स्वतःच्या राज्यात प्रत्यक्षात प्राण्यांचे, पक्षांचे वर्तन बघणे हा निसर्ग प्रेमींसाठी एक वेगळाच समाधानकारक अनुभव आहे.
भारत हा वेगवेगळ्या कोट्यावधी प्रजातींचे एक केंद्र आहे आणि देशात असणाऱ्या विविध राष्ट्रीय उद्यान व वन्यजीव अभयारण्यामुळे निसर्गाच्या या देणगीचा आनंद उपभोगणे अतिशय सोपे आहे. तुमचे जंगल सफारीचे स्वप्न जगण्यासाठी त्यांपैकीच एक उत्तम व लोकप्रिय जागा म्हणजे - ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याजवळ हे रिझर्व्ह आहे. विशेष म्हणजे यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य आहे जे एक उत्तम जंगल सफारीसाठीचे परिपूर्ण मिश्रण आहे. हे रिझर्व्ह वाघ, रानटी कुत्रे, बिबळे, सांबर, चित्ता, रॅटेल, उडणारी खार, नीलगाय, पँगोलीन आणि इतर अनेक वन्यजीव प्रजातींचे घर आहे.
जंगल सफारी व्यतिरिक्त या भागात 'झरना जंगल लॉज' नावाचे अतिशय उत्कृष्ट असे रिसॉर्ट आहे जे ताडोबा नवेगाव गेटपासून जवळपास ३०० मीटर वर स्थित आहे. विविध जंगल सफारी पॅकेजेस सोबतच सायकलिंग, वॉल क्लाइंम्बिग, एक्सपर्टस सोबतचे बर्ड वॉचिंग, बोनफायर, गावातील टूर अशा अनेक ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटीज सह ही एक आरामदायक मुक्काम करण्यालायक जागा आहे. महत्त्वाचे म्हणजे इकोफ्रेंडली झरना जंगल रिसॉर्ट आपल्याला फक्त नैसर्गिक आनंदच देत नाही तर तुम्ही इकडे थांबावे आणि एका उत्तम जंगल सफारीचा अनुभव घ्यावा यासाठी पूर्णपणे सहकार्य करते.
Comments: 0